सॉलोमन बेटे
पॅसिफिक महासागराच्या दक्षिण-पश्चिम भागातील एक स्वतंत्र द्वीपसमूह. ऑस्ट्रेलियापासून ईशान्येस सु. १,६०० किमी.वर, तर न्यू गिनी बेटाच्या पूर्वेस सु. ४८५ किमी.वर हा द्वीपसमूह आहे. या देशात ⇨ ग्वॉदल कॅनल, मालेता, न्यू जॉर्जिया, सॅन क्रिस्तोबल ( माकीरा ), सांता इझाबेल व श्वाझल ही प्रमुख ज्वालामुखी बेटे आहेत.